प्रश्न तुमचे उत्तरे आमची
वय, आरोग्य स्थिती, कव्हरेज रक्कम, जीवनशैली, आणि पॉलिसी प्रकार हे प्रीमियमवर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत. जास्त धोका असलेल्या व्यक्तीसाठी प्रीमियम जास्त असतो.
पॉलिसी संपल्यानंतर ग्रेस पीरियड (Grace Period) दिला जातो. त्यातही रिन्यू न केल्यास पॉलिसी लॅप्स (Lapse) होते आणि फायदे गमावले जाऊ शकतात.
होय, पोर्टेबिलिटी (Portability) द्वारे तुम्ही पॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करू शकता आणि नॉन-क्लेम बोनस (NCB) व वेटिंग पिरियडचे बेनिफिटही कायम राहतात.
ही एक पॉलिसी असते ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित कव्हरेज असते. एकच सम इन्शुर्ड (Sum Insured) रक्कम सर्व सदस्य शेअर करतात.
फ्री लुक पीरियड (Free Look Period) मध्ये इन्शुरन्स रद्द केल्यास पूर्ण रिफंड मिळतो. त्यानंतर रद्द केल्यास वापरलेल्या कालावधीप्रमाणे रक्कम परत केली जाते.
टर्म इन्शुरन्स पॉलिसी ट्रान्सफर करता येत नाही. टर्म पॉलिसी ही इंडिव्हिज्युअल-स्पेसिफिक(individual-specific) असते. ती व्यक्तीच्या:
वयावर,आरोग्य स्थितीवर,वैयक्तिक माहितीवर,उत्पन्न आणि जीवनशैलीवर आधारित असते. म्हणूनच, ती इतर कोणालाही ट्रान्सफर (transfer) करता येत नाही.
Proposer म्हणजे ज्या व्यक्तीने इन्शुरन्स पॉलिसीसाठी अर्ज केला आहे आणि प्रीमियम भरतो. Insured Person म्हणजे ज्या व्यक्तीसाठी इन्शुरन्स घेतला आहे.
तिच्या मृत्यूनंतर किंवा हॉस्पिटलायझेशननंतर क्लेम मिळतो.
टर्म इन्शुरन्ससाठी काही वैद्यकीय चाचण्या स्पेशल मेडिकल रिपोर्ट्स (Special Medical Reports) आवश्यक असतात, जसे की रक्त तपासणी, ECG, Sugar, Liver/Kidney टेस्ट, X-ray इ. या चाचण्या कंपनीला जोखीम समजून घ्यायला आणि योग्य प्रीमियम ठरवायला मदत करतात. यामुळे क्लेम मंजुरी सोपी होते आणि पॉलिसी वैध राहते.
क्लेम सेटलमेंट रेशो (CSR) म्हणजे इन्शुरन्स कंपनीने एका वर्षात प्राप्त झालेल्या एकूण क्लेमपैकी किती क्लेम मंजूर केले, याचे प्रमाण.
उदा. जर कंपनीकडे 1000 क्लेम आले आणि 950 मंजूर झाले, तर CSR = 95%.
CSR जास्त म्हणजे कंपनी विश्वसनीय आणि क्लेम मंजूर होण्याची शक्यता जास्त. पॉलिसी निवडताना CSR 95% पेक्षा जास्त असणं चांगलं मानलं जातं.
होय, टर्म प्लॅनची प्रीमियम रक्कम पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी फिक्स्ड असते.एकदा प्रीमियम ठरला की तो दरवर्षी किंवा मासिक हप्ता म्हणून बदलत नाही.
ही स्थिरता दीर्घकालीन नियोजनासाठी फायदेशीर ठरते.